Latest

The Eye : श्रुती हासनचा ‘द आय’ चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर, आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची चर्चा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री श्रुती हासनचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट 'द आय' चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाले आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे की, "द (The Eye) आय…कधी-कधी तुम्हाला जादुई, भावनात्मक आणि खऱ्या गोष्टीचा हिस्सा बनण्याची संधी मिळते- ही माझ्यासाठी विशेष चित्रपट होता – मी तुम्ही सर्वजण हा चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही." डॅफने श्मोन दिग्दर्शित चितचाटाला ग्रीक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि फोटोग्राफीसाठी नामांकित करण्यात आले आगे. लंडन इंडिपेंडेंट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकित करण्यात आलं होतं. (The Eye)

संबंधित बातम्या –

तिने पुढे म्हटलंय- "द आय या चित्रपटाला ग्रीक आंतरराष्ट्रीय चित्रपट स्क्रीनिंगमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक @daphneschmon आणि @jameschegwyn यांना नामांकित करण्यात आलं आहे…."

तिने पुढे आपल्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे. "आय कोर्फूमध्ये चित्रीत करण्यात आलं होतं आणि पर्यावरणासाठी प्रेम देखरेखीसह बनवण्यात आलं होतं. संपूर्ण कलाकार आणि चालक दलाने ग्रीन शूट्स सस्टेनेबिलिटी प्लॅटफॉर्मचा उपयोग करून पर्यावरण आणि कार्बनचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने काम केलं आहे.

SCROLL FOR NEXT