Latest

Mass Shooting at University : मध्य युरोपातील झेकमध्ये मोठी घटना! प्राग येथील विद्यापीठात गोळीबार, ११ ठार तर ९ जखमी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथील चार्ल्स विद्यापीठात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झालेला असून ९ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. गोळीबार करण्यात आलेल्या व्यक्तीचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित व्यक्तींची किंवा हल्लेखोर(गोळीबार करणाऱ्या) व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

झेकचे गृहमंत्री विट रकुसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रागच्या ओल्ड टाऊनजवळील चार्ल्स विद्यापीठाच्या कला विद्याशाखेत गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारातील सुत्रधाराला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या विद्यापीठाची इमारतीमधील लोकांना बाहेर काढले जात आहे. घटनास्थळी अनेक लोक मृतअवस्थेत आणि जखमी अवस्थेत आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ओल्ड टाऊनजवळील फॅकल्टी ऑफ आर्ट्समध्ये हा गोळीबार झाला. कॅम्पसमध्ये झालेल्या गोळीबारानंतर विद्यार्थ्यांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. एक्सवर पोस्ट करुन या घटनेची माहिती दिली आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT