Latest

पंजाबनंतर बंगालमध्ये बीएसएफ जवानाची सहकाऱ्यावर गोळी झाडून स्वत:ही केली आत्महत्या

backup backup

मुर्शिदाबाद, पुढारी ऑनलाईन : रविवारी अमृतसरमध्ये ड्युटीचा त्रास होत असणाऱ्या बीएसएफ जवानाने चार सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या . त्यानंतर स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये एका बीएसएफ जवानाने सहकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, "ही घटना भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेनजिक असणाऱ्या बीएसएफच्या जलांगी शिबिरात सकाळच्या सुमारास घडलेली आहे. या दोघांना स्थानिक पोलिसांनी बोलवले होते. त्यानंतर त्यांचा चकमक झाली."

अमृतसरमध्ये घडलेली घटना अशी होती…

अमृतसरमध्‍ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मसेमध्‍ये जवानाने (BSF jawan) सहाकार्‍यांवर काल सकाळी अंदाधूंद गोळीबार केला. या धक्‍कादायक घटनेत ४ जवान ठार झाले असून, दहा जण जखमी झाल्‍याचे वृत्त आहे. कटप्‍पा असे गोळीबार करणार्‍या बीएसएफ कॉन्‍स्‍टेबलचे नाव असून, त्‍याला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

BSF jawan : गोळीबारानंतर कॉन्‍स्‍टेबलची आत्‍महत्‍या

अमृतसरपासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर बीएसएफचे मुख्‍यालय आहे. येथे १४४ बटालियनचे जवान तैनात होते.आज सकाळी कॉन्‍स्‍टेबल सत्तेप्‍पा हा मेसमध्‍ये आला. त्‍याने अचानक सहकार्‍यांवर गोळीबार केला. या घटनेने एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच तत्‍काळ पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतील.

गोळीबार करणार्‍या कॉन्‍स्‍टेबल सत्तेप्‍पा याने स्‍वत:वर गोळी झाडून आत्‍महत्‍या केली. जखमी जवानांना गुरु नानक देव हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. उपचार सुरु असताना तीन जवानांचा मृत्‍यू झाल्‍याचे सूत्रांनी सांगितले. कॉन्‍स्‍टेबल सत्तेप्‍पा याने गोळीबार का केला याचे कारण अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या घटनेच्‍या सखोल चौकशीचे आदेश बीएसएफने दिले आहेत.

पहा व्हिडिओ : व्यथा कांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या झोरे कुटुंबाची | A village with only one Family

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT