Latest

Shoaib Akhtar On Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह बाबत शोएब अख्तरचे मोठे विधान; म्हणाला…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाल्याने या वर्षी खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाला तो मुकणार आहे. जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने याबाबत मोठे विधान केले आहे. टी-२० विश्वचषकाला सुरूवात होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर पडल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. (Shoaib Akhtar On Jasprit Bumrah)

जसप्रीत बुमराह जखमी झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज बुमराह बाबत बोलताना म्हणाला की, भारतासाठी बुमराह क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहिला तर हा त्याच्या करियरसाठी मोठा धोका आहे. शोएब अख्तर जसप्रीत बुमराहची तुलना इयान बिशप आणि शेन बाँड यांच्याशी करत म्हणाला की, बुमराह क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळू शकणार नाही. कारण बुमराहच्या बॉलिंग अॅक्शनमुळे त्याला कायम पाठीच्या दुखापतीला सामोरे जावे लागेल. (Shoaib Akhtar On Jasprit Bumrah)

पुढे बोलताना अख्तर म्हणाला, बुमराहची अॅक्शन फ्रंटल या अॅक्शन प्रकारात मोडते. या अॅक्शनमध्ये वेगवान गोलंदाज आपल्या खांदा आणि पाठीच्या आधारे वेग धारण करतात. दरम्यान, बुमराह जखमी असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित टी-२० मालिकेसाठी त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. (Shoaib Akhtar On Jasprit Bumrah)

आशिया चषक स्पर्धाही खेळू शकला नव्हता बुमराह

जसप्रीत बुमराह जखमी असल्याने आशिया चषक स्पर्धा खेळू शकला नव्हता. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली होती. दरम्यान, दक्षिण आफ्रेविरुद्ध भारतीय संघात परतलेला जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा पाठीच्या दुखापतीने त्रस्त झाला आहे. यॉर्कर हे बुमराहचे सर्वांत महत्वाचे अस्त्र आहे. याच अस्त्राने त्याने अनेक फलंदाजांना आस्मान दाखवले आहे. (Shoaib Akhtar On Jasprit Bumrah)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय फॉरमॅटमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर १२१ बळी आहेत. एकदिवसीय सामन्यात १९ धावा देत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ६० सामने खेळत ७० बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये ८ वेळेस ५ बळी घेतले आहेत. (Shoaib Akhtar On Jasprit Bumrah)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT