पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर पाठोपाठ ठाकरे गटाचाही दमदार असा टिझर (Shivsena Dasra Melava)आला आहे. हा टिझर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. "एक नेता, एक झेंडा, एक मैदान…शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!" असं कॅप्शन देत अवघ्या ३५ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे.
Shivsena Dasra Melava : काय आहे टिझरमध्ये
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर पाठोपाठ ठाकरे गटाचाही दमदार असा टिझर आला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. "एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर, ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. असं लिहित ३५ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला भगवे झेंडे आणि शिवसेनेच्या वाघाचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसत आहे. त्याच बरोबर या ३५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये जुन्या दसरा मेळाव्याचे काही क्षण दाखवले आहेत. टिझरमध्ये निष्ठेचा सागर उसळणार…, भगवा अटकेपार फडकणार…, महाराष्ट्राची ताकद दिसणार…, अशी वाक्य काही सेंकदांनी पाठोपाठ दाखवली आहेत. आणखी या व्हिडिओमध्ये लक्षवेधी बाब म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो मातांनो… हा आवाज. यामध्ये उद्धव ठाकरे यांची दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. लास्टला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिसत आहेत.
Shivsena Dasra Melava : शिंदे गटाचा टिझर
शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या टिझरच्या अगोदर शिंदे गटाचा टिझर आणि एक पोस्टर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ… असं कॅप्शन दिलं आहे. त्याचबरोबर या पोस्टरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो पाहायला मिळत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केलेला हा टिझर "वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या!" असं कॅप्शन देत रिट्विट केला आहे.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.