Latest

संगमनेरात शिवसेना निवडीवरून संताप, संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांच्या निषेधाच्या दिल्या घोषणा

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यांना व शिवसैनिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता पदाधिकारी निवडी केल्या. तसेच जनार्दन आहेर यांची अचानक तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यांनी संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या निषेधाच्या घोषणा देत तीव्र स्वरूपात संताप व्यक्त केला.

संगमनेर शहर आणि तालुका पदाधिकार्‍यांच्या निवडी झाल्या आहेत, त्या निवडी आम्हा पदाधिकारी आणि शिव सैनिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता केलेल्या आहेत. संगमनेर तालुक्यातच नव्हे तर पठार भागामध्ये जनार्दन आहेर यांचे जनमानसामध्ये चांगले काम आहे. त्यात नुकत्याच झालेल्या पदाधिकार्‍यांच्या निवडीमध्ये त्यांचा पत्ता कट करीत त्यांच्या जागेवर भाऊसाहेब हासे यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली. त्यामुळे आहेर त्यांच्यावर एक प्रकारचा शिवसेनेच्या वरिष्ठांनी अन्याय केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍यांनी तीव्र संताप व्यक्त करीत संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.

यावेळी सोमनाथ काळे, युवराज गुंजाळ, संतोष कुटे, संदीप गुंजाळ, उज्वलाताई गुळवे, शाम रहाणे, राम रहाणे, भीमाशंकर पावशे, अनिल खेमनर, रणजीत जाधव, अविनाश धुळगंड, उत्तम ढेरंगे, मच्छू दिघे, सचिन पावबाके, संकेत खुळे, सुनील खुळे, निलेश गुंजाळ, एकनाथ मुंडे, नंदू कानोरे, संभाजी धात्रक, दत्ता गाडेकर, वैभव आहेर, दत्ता खांदारे, भरत खांदारे, संदीप खिलारी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

पुनर्रविचार व्हावा..!

या निवडीचा पुनर्रविचार होऊन आम्हा शिवसैनिकांना विश्वासात घेऊन फेरनिवडी करण्यात याव्यात, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी उप जिल्हा प्रमुख दिलीपराव साळगट, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, दीपक खेमनर, रवींद्र गिरी, पप्पू कानकाटे, अमोल कवडे आदींनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT