Latest

Shivjayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील भद्रकाली परिसरातून मुख्य मिरवणुक निघणार आहे. तसेच नाशिकरोड, पाथर्डी फाटा व पंचवटीत जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त गर्दी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१९) दुपारी बारापासून मध्यरात्री बारापर्यंत हे बदल राहणार आहेत. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बॅरकेडिंग करण्यात आल्याची माहिती, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांवरून वाहने न्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

मुख्य मिरवणूक मार्ग (वाकडी बारव)
बंद मार्ग : वाकडी बारव – महात्मा फुले मंडई – भद्रकाली मार्केट – बादशाही कॉर्नर – गाडगे महाराज पुतळा – मेनरोड – धुमाळ पॉइंट – सांगली बँक सिग्नल – मेहेर सिग्नल – अशोकस्तंभ – रविवार कारंजा – मालेगाव स्टँड – पंचवटी कारंजामार्गे मालवीय चौकातून रामकुंडापर्यंत.

पर्यायी मार्ग : निमाणी व पंचवटी कारंजापासून सुटणाऱ्या सिटी लिंक बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. रविवार कारंजा व अशोतस्तंभमार्गे जाणाऱ्या सिटी लिंक बसेस शालीमारवरुन जातील. तसेच सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे नाशिकरोड व शहरात इतरत्र जातील.

नाशिकरोड परिसर
छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिकरोड आणि जेलरोड या दोन ठिकाणी शिवजयंती उत्सव राहणार असून १९ फेब्रुवारी रोजी मिरवणूक आयोजित केली आहे. २० ते २२ फेब्रुवारी सायंकाळी ७ ते साडेदहा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आहे.

बंद मार्ग : बिटको चौक व सिन्नरफाटासह रेल्वे स्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उड्डाणपुलाखालून जाणारी वाहतूक बंद असेल. बिटको चौकातून जेलरोडमार्गे व नांदूरनाकाकडून बिटको चौकाकडे दोन्ही बाजूची वाहतूक बंद आहे.

पर्यायी मार्ग : रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी दत्त मंदिर सिग्नल, सुराणा हॉस्पिटल, आनंदनगर टी पॉइंट, सत्कार टी पॉइंट, रिपोर्टे कॉर्नरमार्गे रेल्वे स्टेशन असा मार्ग आहे. सुभाष रोडमार्गे परतीची वाहतूक. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या सिटी लिंक बसेस नाशिकरोड जुने न्यायालयासमोरुन आर्टिलरी रोडमार्गे जयभवानी चौकातून उपनगर सिग्नलमार्गे जातील. पुणे-नाशिक सर्व प्रकारची वाहतूक दत्त मंदिर चौकातून उड्डाणपुलावरुन सिन्नर फाट्याकडे दुतर्फा आहे. बिटको चौकातून जेलरोडमार्गे नांदूर नाक्याकडे जाणारी वाहतूक इंगळे नगर येथून कॅनल रोड ते हरीविहार समोरील रस्त्यावरुन नारायणबापू नगरमार्गे टाकळीकडे जातील. नांदूर नाक्याकडून बिटको चौकात येणारी वाहतूक दसक पुलावरुन एकेरी मार्गावर सुरू असेल

अंबड परिसर
बंद मार्ग : बोधले नगर सिग्नल, कलानगर, पाथर्डी फाटा, पाथर्डी सिग्नल ते गरवारे दुतर्फा अवजड वाहतूक बंद असेल. पाथर्डी गाव ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरुन अंबड-सातपूर मार्गावरील अवजड वाहतूक बंद असेल.

पर्यायी मार्ग : गरवारे पॉइंट येथील उड्डाणपूलावरुन द्वारकाकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. बोधले नगर सिग्नलवरुन द्वारकापर्यंत व तेथून उड्डाणपूलावरुन गरवारे पॉइंटकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. तर पाथर्डी गाव, सिग्नलमार्गे सातपूरकडे जाणारी वाहतूक पांडवलेणीसमोरील बोगद्यातून अंबड एमआयडीसीमार्गे वाहने जातील.

पंचवटी परिसर
बंद मार्ग : मालेगाव स्टँड – इंद्रकुंड – पंचवटी कारंजा – दिंडोरी नाका व मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टँड अशी दुतर्फा वाहतूक बंद असेल.

पर्यायी मार्ग : दिंडोरी नाका – पेठ नाका – मखमलाबाद नाका – रामवाडी पूलमार्गे इतरत्र वाहतूक वळवण्यात आली आहे. मखमलाबाद नाका – बायजाबाई छावणी – रामवाडी पूलमार्गे इतरत्र वाहने जाऊ शकतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणारी वाहतूक आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे इतरत्र जातील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT