Latest

2024ची विधानसभा निवडणूक महायुतीच जिंकणार : देवेंद्र फडणवीस

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन : 2024 ची विधानसभा महायुतीच जिंकेल. निवडणुकांसाठी आम्ही तयार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 'पुढारी न्यूज'च्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

अखंड 85 वर्षांची परंपरा लाभलेल्या 'पुढारी' वृत्तसमूहाच्या 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनलचे मंगळवार, दि. 29 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात लाँचिंग (ऑन एअर) झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चॅनलच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी 'पुढारी न्यूज'च्या मंचावरून सरकारमधील तीन दिग्गज नेत्यांची पहिल्यांदाच एकत्रीतरित्या मुलाखत घेण्यात आली.

पुढारी वृत्तसमूहाने इलेक्ट्रॉनिक मीडियात दिमाखात पदार्पण केले आहे. प्रिंट मीडिया, एफ.एम. रेडिओ (ब्रॉडकास्टिंग मीडिया) आणि डिजिटल प्लॅटफॉर्मपाठोपाठ 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनलचे हे नवे पाऊल आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT