Latest

Shilpa Shetty : किमान वयाचा तर विचार कर !; शिल्पा झाली ट्रोल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty ) फिटनेस आणि स्टायलिश लूकवरून नेहमीच चर्चेत असते. नुकतेच ती एका सोहळ्यात पोहोचली होती. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात शिल्पाने डीप नेक आऊटफिट आणि त्यावर एका पांढऱ्या रंगाचा कोट घातल्याचे दिसत आहे. आता या व्हिडीओवरून युजर्सला तिला ट्रोल करत आहे.

किमान हिने वयाचा तरी विचार करायला हवा होता असे एकाने तर या अवतारात तू अजिबात चांगली दिसत नसल्याचे असे दुसऱ्या एका युजर्स म्हणत ट्रोल केले आहे. व्हायरल व्हिडीओत शिल्पा पापाराझींना पोझ देत असल्याचे दिसत आहे. यामध्ये ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे, पण या ड्रेसमध्ये ती काही कन्फर्टेबल नसल्याचे दिसत आहे.

SCROLL FOR NEXT