Latest

शिखा पांडेने टाकलेला चेंडू पाहून तोंडात बोटे घालाल! ( Video )

backup backup

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी २० मालिका खेळत आहे. आज दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४ विकेट्सनी पराभव केला. मात्र सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजय नाही तर शिखा पांडेने टाकलेला चेंडू जास्त चर्चेत आला आहे. तुम्हीही शिखा पांडेने टाकेलला चेंडू पाहून अवाक व्हाल. भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरने तर या चेंडूला शतकातील सर्वोत्त चेंडू म्हणून घोषितही केले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफे जिंकून प्रथम भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताला २० षटकात ९ बाद ११८ धावांपर्यंतच मजल मारता आली. यात पूजा वस्त्रकारने ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया हे विजयासाठीचे ११९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतले.

मात्र शिखा पांडेने पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. तिने एलिसा हेलेलाचा ४ धावांवर त्रिफळा उडवला. शिखा पांडेने टाकलेला चेंडू जो एलिसाची दांडी गुल करुन गेला. तो चेंडू पाहिला तर तुम्हीही अवाक व्हाल. शिखाने उजव्या हाताची फलंदाज हेलेला ऑफ स्टम्पच्या बाहेर शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू टाकला. हा ऑफ स्टम्पच्या बाहेर पडून इतका इन स्विंग झाला की काही कळण्याच्या आतच एलिसा हेलेची दांडी गुल करून गेला.

हा चेंडू पाहिल्यानंतर भारताचा सलामीवीर वासिम जाफरने या विकेटचा व्हिडिओ ट्विट केला. या ट्विटला त्याने 'शतकातील सर्वोत्तम चेंडू, महिला क्रिकेट! शिखा पांडे तुला सलाम!' असे कॅप्शन दिले.

शिखा पांडेने भारतीय गोलंदाजीची धडाक्यात सुरुवात केली. त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने ऑस्ट्रेलियाची मधली फळी आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत कांगारुंना अडचणीत आणले होते. मात्र ताहलिया मॅकग्राथने ३३ चेंडूत ४२ धावांची झुंजार खेळी करत ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात विजय मिळून दिला. ऑस्ट्रेलियाने दुसरा टी २० सामना जिंकत मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे ड्रॉ करण्यात आला होता.

SCROLL FOR NEXT