Latest

Shares Market : सेन्सेक्स 150 अंकांनी वर, निफ्टी 18,300 च्या आसपास, नाईका, वेदांता फोकसमध्ये

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shares Market : शेअर बाजाराने आज सकाळपासून चांगली सुरुवात करत सेन्सेक्स 150 अंकांनी वर गेला आहे. तर निफ्टी देखील 18300 च्या जवळपास पोहोचला आहे. बाजाराच्या सुरुवातीलाच नाईका, वेदांता, सिमेंस या कंपन्या फोकसमध्ये आहेत. तर हिंदालको इंडस्ट्रीज, सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब्स, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्स हे निफ्टीमध्ये यांनी मोठा नफा नोंदवल्याचे दिसत आहे. तसेच आज शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या संकेताने झाली आहे.

Shares Market : शेअर बाजाराची या आठवड्याची सुरुवात नकारात्मक झाली होती. अस्थिरतेमुळे सेनेक्स तब्बल 450 अंकांनी खाली होता. त्यानंतर काल मंगळवारी देखिल बाजाराची सुरुवात थोड्या अंकांच्या घसरणीने झाली होती. मात्र नंतर सेनेक्स आणि निफ्टी दोन्हींची घसरण थांबवून दोन्ही निर्देशांक वधारले होते. काल मंगळवारी सेनेक्स 274 अंकांच्या वाढीसह 61,419 वर बंद झाला. तर निफ्टी 84 अंकांनी वाढून 18,244 वर बंद झाला.

त्यानंतर आज बुधवारी सकाळपासून शेअर बाजाराने चांगली सुरुवात करत 150 अंकांनी सेनेक्स वर आला आहे. त्यानंतर काही वेळातच सेनेक्सने 200 अंकांवर झेप घेतली. तर निफ्टी 50 अंकांनी वधारला आहे.

Shares Market : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज सकारात्मक झाली. मंगळवारी यूएस स्टॉकचे मूल्य मंगळवारी वाढले आणि तिन्ही प्रमुख निर्देशांक 1% पेक्षा जास्त वाढले आणि आशियातील समभागांनी सुरुवातीच्या व्यापारातही उच्च व्यापार केला. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.56% आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 0.6% वाढला, तर जपानी बाजारपेठा सार्वजनिक सुट्टीसाठी बंद आहेत. अमेरिकेत एका रात्रीत, डाऊ जोन्स 1.18%, Nasdaq 1.36% आणि S&P 500 1.36% वाढले. या कारणांमुळे जागतिक संकेत सकारात्मक होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज हिरव्या संकेतांनी झाली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT