Latest

Share Market Today | कच्चे तेल महागले, शेअर बाजारात घसरण, आरबीआयच्या पतधोरण निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

दीपक दि. भांदिगरे

Share Market Today : जागतिक कमकुवत संकेतामुळे आज मंगळवारी (दि.६) भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात घसरले. सेन्सेक्स ३३० अंकांनी घसरून ६२,५०० अंकांवर तर निफ्टी १८,६०० वर व्यवहार करत होता.

आशियाई बाजारातही सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.४७ टक्क्यांनी, चीनचा शांघाय कंपोझिट ०.४० टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.१३ टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई निर्देशांक मात्र ०.१३ टक्क्यांनी वधारला. अमेरिकेतील प्रमुख तिन्ही निर्देशांक खाली आले आहेत.

भारतीय शेअर बाजारांचे लक्ष आता आरबीआयच्या पतविषयक धोरणाच्या निर्णयावर आहे. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) व्याजदर केवळ ३५ बेसिस पॉईंट्सने वाढविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात चढ-उतार सुरु आहे. (Share Market Today)

एनएसई आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी १,१३९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २,६०७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. बीएसई सेन्सेक्स सोमवारी ३४ अंक म्हणजे ०.०५ टक्क्यांनी घसरून ६२,८३५ वर बंद झाला होता. तर निफ्टी (NSE) १८,७०१ वर स्थिरावला होता.

कच्च्या तेलाचे दर भडकले….

पाश्चिमात्य देशांनी सोमवारी रशियन तेलावर प्रति बॅरल ६० डॉलरची मर्यादा लादली आहे. युक्रेनबाबत रशियावर दबाव आणण्यासाठी ही नवी रणनिती आखण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, जपान, अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या २७ देशांनी शुक्रवारी रशियन तेलासाठी प्रति बॅरल ६० डॉलरची मर्यादा निश्चित केली. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स ६६ सेंटने वाढून प्रति बॅरल ८३ डॉलरवर पोहोचले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT