Latest

NCP crisis : ‘राष्‍ट्रवादी’ काेणाची? : विधानसभा अध्‍यक्षांंना सुप्रीम काेर्टाची नाेटीस

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाविरोधात शरद पवार गटाने दाखल केलेल्‍या याचिकेवर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी हाेईल, असे आज सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, सर्वोच्‍च न्‍यायालयाने  या प्रकरणी महाराष्‍ट्राचे विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस जारी केली आहे. तसेच शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्‍या याचिकेवर आता एकत्रित सुनावणी होईल, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा कोणाचा आणि चिन्हाचे खरे दावेदार कोण, हे विषय सध्या ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्‍या वतीने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे. शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या या याचिकेत अजित पवार गटाचे ४१ आमदार अपात्र करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अजित पवार आणि इतर सात आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना द्यावेत, अशी मागणीही शरद पवार गटाने याचिकेतून केली होती.

SCROLL FOR NEXT