Latest

शहनाज गिल एल्विश यादवसोबतच्या पार्टीत चाहत्‍यांनी ‘या’ मुद्द्यावर अभिनेत्रीला केले ट्रोल!

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिग बॉस OTT 2 जिंकल्यानंतर एल्विश यादवने आपला प्रभाव चाहत्‍यांमध्ये कायम ठेवला आहे. एल्विश यादव आपल्‍या आयुष्यातील अपडेट चाहत्यांसाठी देत असतो. नुकतेच शहनाज गिल आणि एल्विश यादव एकत्र आले होते. याबाबत त्‍याने सोशल मिडीयावर व्हिडीओही शेअर केले आहेत.

एल्विश यादव आणि शहनाज गिल यांनी रात्री केली पार्टी

एल्विश यादव आणि शहनाज गिल हे दोघे रात्री एकत्र आले होते. दोघांनी एकत्र पार्टी केली. यांच्या पार्टीचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये एल्विश यादवचे मित्रही होते. तर या पार्टीमध्ये शहनाज गिलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर दोघे एकाच कारमध्ये घराकडे जातानाही दिसले.

या मुद्द्यावर चाहत्यांनी अभिनेत्रीला केले ट्रोल

शहनाज आणि एल्विशला एकत्र पाहिल्यानंतर अनेकांना दोघे एकत्र कसे पार्टी करत आहेत या विषयी प्रश्न पडला आहे आणि यावरून अनेकांनी शहनाजला ट्रोल करायला सुरु केले. पार्टीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते म्‍हणाले, शहनाज गिल आता खूपच खराब झाली आहे. बिग बॉसमध्ये तिने सर्वांच्या मनावर राज्‍य केले होते. तर दुसरीकडे एल्विश यादवबद्दल म्हणाले प्रत्येकासाठी वेळ असतो पण मनीषासाठी नाही.

-हेही वाचा 

SCROLL FOR NEXT