पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. इंडस्ट्रीत त्याच्या पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या काही बातम्या समोर येत आहेत की आर्यन खान वेब सीरिजवमधून चंदेरी दुनियेत प्रदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. या वेब सीरिजचे काम सुरू झाल्याचेहे समजते आहे.
आर्यन खान एका कॉमेडी सीरीजवर काम करत आहे. Peepingmoon.com या वेब साईटच्या माहितीनुसार आर्यन रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या लेखन टीमसोबत एक वेब सिरीज बनवत आहे जी हिंदी सिनेमा उद्योगाचे काल्पनिक चित्रण असेल. मुंबईत स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी अभिनेत्याला किती कठीण प्रसंगातून जावे लागते हे दाखवण्यात येणार आहे. वेब सीरिज 2023 मध्ये फ्लोरवर जाण्याची अपेक्षा आहे.
वेबसाइटने वृत्तात सांगितले आहे की, 'एक स्टार किड असल्याने आर्यनला फिल्म इंडस्ट्री कशी चालते हे चांगलेच ठाऊक आहे. तो या 'टिन्सेलटाउन' या व्यंगात्मक सीरिजवर स्वतः काम करत आहे. तो शो रनर म्हणून काम करेल. परंतु त्याचे दिग्दर्शन करणार नाही. या सीरिजची एक मजेशीर, मार्मिक आणि मुंबईच्या चित्रपटसृष्टीत घडलेली कथा आहे, जी एका नवोदित तरुण अभिनेता आणि त्याच्या मित्रांच्या माध्यमातून कथन केली जाणार आहे.'
2023 हे वर्ष शाहरुखच्या कुटुंबासाठी संस्मरणीय आणि खास असणार आहे. आर्यनसोबत, त्याची बहिण सुहाना खान ही देखील झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे आर्यन सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. इंस्टाग्रामवर त्याचे दोन मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत पण त्याचे काही मोजकेच फोटो इन्स्टावर उपलब्ध आहेत. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो विमानतळावर वडील किंग खानची काळजी घेताना दिसत होता. चाहत्यांनी त्याचे कौतुक केले.