Latest

जपान, अमेरिकेला साडे सात टन आंबा निर्यात

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्य कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रामधील व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधेच्या वापरातून शनिवार ८ एप्रिल रोजी 1100 किलो केशर व बैगनपल्ली आंबा जपानला निर्यात करण्यात आला आहे. तसेच मंगळवार ११ एप्रिल रोजी अमेरिकेला येथील विकिरण सुविधेच्या वापरातून हापूस, केशर व बैगनपल्ली जातीच्या आंब्यांची मिळून साडे सहा मेट्रिक टनाइतकी यंदाच्या हंगामात हवाई वाहतुकीद्वारे निर्यात करण्यात आली आहे.

अमेरिकेकरिता आंब्याच्या निर्यातीस पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दिपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरुवात झाली. यावेळी अमेरिकेचे निरीक्षक एलीफ्रिडो मारिन (फ्रेडी), केंद्राच्या राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्थेचे (एन.पी.पी.ओ.) अधिकारी डॉ. वेंकट रेड्डी, अपेडाच्या प्रणिता चौरे व निर्यातदारांचे प्रतिनिधी, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जपान, न्युझीलंड, दक्षिण कोरिया, युरोपीयन देश तसेच रशिया या आयातदार देशांच्या निकषांन्वये निर्यातीपूर्वी आंब्यावर व्हेपर हीट ट्रिटमेंट प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. फळमाशीचा (फ्रूट फ्लाय) होणारा प्रादुर्भाव नष्ट होण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. कृषि पणन मंडळाच्या अद्ययावत अशा व्हेपर हीट ट्रिटमेंट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे.

विकसीत देशांना आंबा निर्यातीकरिता आवश्यक असलेल्या सर्व विशेष प्रक्रिया पणन मंडळाने उपलब्ध करुन आहेत. या सुविधांचा वापर आंबा निर्यातदार व आंबा उत्पादक शेतकरी करीत असुन उत्पादकांना चांगले दर मिळण्यास मदत होत असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दिपक शिंदे यांनी कळविली आहे.

विकिरणाद्वारे आंब्यामधील कोयकिडा व किटकांचे निर्मुलन

अमेरीका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, अर्जेंटीना या आयातदार देशांच्या निकषान्वये निर्यातीपूर्वी आंब्यामधील कोयकिडा व किटकांचे निर्मुलन करण्याकरिता विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे. आंब्यांवरील विकिरण सुविधेत कोबाल्ट-60 किरणांचा वापर केला जातो. विकिरण प्रक्रिया उष्णता व रसायन विरहीत प्रक्रिया असल्याने अन्नपदार्थाच्या मुळ गुणधर्मामध्ये कोणतेही बदल होत नाहीत. सुविधेवर विकीरण प्रक्रिया करताना अमेरिकेचे निरीक्षक प्रत्यक्ष उपस्थित असतात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT