Latest

Video : विधानभवन परिसरात छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभारा; शिवेंद्रराजे भोसले यांची मागणी

backup backup

सातारा, पुढारी वृत्तसेवा : विधानभवन परिसरात सिंहासनावर बसलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्यांच्या इतिहासाला आणि विधानभवन परिसराला न शोभणारा आहे. सध्याच्या पुतळ्याची उंचीही कमी असून त्याला मेघडंबरीही नाही. त्यामुळे याठिकाणी छत्रपती शिवरायांचा त्यांच्या इतिहासाप्रमाणे भव्यदिव्य असा पुतळा उभा करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विधीमंडळात केली.

विधीमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात गुरूवारी (दि. २५ ऑगस्ट) आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी ही मागणी केली. सध्या असलेला पुतळा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमासारखा वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहे. शिवाजी महाराजांचा इतिहासही फार मोठा आहे. नुसते 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असे म्हटले तरी रक्त सळसळते आणि उर भरून येतो. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाला आदर आहे, असे असताना त्यांचा विधान भवन परिसरातील पुतळा हा त्यांच्या इतिहासाला न शोभणारा आहे. राजघराण्यातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी हा पुतळा भव्य दिव्य करावा, अशी मागणी करत असल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT