Latest

Sensex Opening Bell : निराशेचे मळभ हटले, शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स 300, निफ्टी 18300 अंकांवर

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sensex Opening Bell : चीनमध्‍ये कोरोनाचा वाढता पार्दुभाव संदिग्ध वातावरणामुळे  बुधवारी ( दि. २१) भारतीय शेअर बाजाराची घसरण झाली होती. त्यातून सावरून आज भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. आज गुरुवावरी बाजार फक्त सावरलाच नाही तर सेनेक्स आणि निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स आज 190 अंकाच्या वृद्धीसह सुरू होऊन तब्बल 300 अंकांनी वर आला आहे. तर निफ्टीने 18300 चा आकडा पार केला आहे.

Sensex Opening Bell : आज आठवड्याच्या चौथ्या धिवशी सेनेक्स 190 अंकांच्या तेजीसह 61257 अंकांवर तर निफ्टी 90 अंकांच्या तेजीसह 18288 अंकांवर गेला आहे. तर बँक निफ्टी 246 अंकांवरून तेजीसह 42865 अंकांवर उघडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिथे अमेरिकन बाजार तेजीसह बंद होत होते. तिथे भारतीय बाजार गडगडला होता. मात्र, दोन दिवसाच्या या घसरणीनंतर आज बाजारात चांगली वाढ दिसून येत आहे.

Sensex Opening Bell : सिंगापूर एक्सचेंज निफ्टी वायदा बाजार 91 अंक म्हणजेच 0.50 प्रतिशत गतीने 18 हजार 341 वर कारोबार करताना दिसत आहे. तसेच वॉल स्ट्रीट आणि एशियन बाजाराचा चांगला परिणाम आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. सेन्सेक्सचे 30 शेअरमध्ये 23 ग्रीन सिग्नलमध्ये व्यापार करताना पाहायला मिळाले.

भारतीय शेअर बाजारात आज, भारती एअरटेल 1.14, आईसीआयसीआय बँक, एचसीएल, इन्फोसिस आणि टाटा स्टीलसारखे शेअर्स मजबूत आहेत, काल एनटीपीसी, एलएंडटी, मारुती आणि एक्सिस बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपया 82.80 वर उघडला. मागील सत्रात तो 82.81 च्या पातळीवर बंद झाला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT