Latest

Sensex Closing Bell : सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला, शेअर बाजारात आज काय घडलं?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन :  दाेन दिवसांच्‍या घसरणीनंतर देशांतर्गत शेअर बाजाराने आज (दि.४एप्रिल) तेजी अनुभवली. आजचे व्‍यवहार बंद हाेताना  सेन्सेक्स 350 अंकांनी वधारून 74,227 वर बंद झाला तर निफ्टीने 22600 चा टप्पा पार केला. शेवटी निर्देशांक 80 अंकांनी वाढून 22,514 वर स्‍थिरावला.सलग 9 दिवसांच्या वाढीनंतर निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 50000 च्या वर गेला. दरम्‍यान, बुधवारी सेन्सेक्स 27 अंकांनी घसरून 73,876 वर बंद झाला होता.

दोन दिवसांच्‍या घसरणीनंतर आश्‍वासक सुरुवात

दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने तेजी अनुभवली. आज (दि.४ एप्रिल) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा विक्रमी पातळीवर व्यवहार करताना दिसले. सेन्सेक्सने 74,400 चा टप्पा पार केला. तर निफ्टीनेही प्रथमच 22,600 ची पातळी गाठली. दरम्‍यान, बुधवार, ३ एप्रिलला सेन्सेक्स 27 अंकांनी घसरून 73,876 वर बंद झाला होता. आज BSE सेन्सेक्स ४९७.०६ अंकांच्या म्हणजेच ०.६७ टक्क्यांच्या वाढीसह ७४,३७३.८८ या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 144.70 अंकांच्या किंवा 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 22,579.35 चा नवा उच्चांक गाठला.

धातू आणि बँकिंग क्षेत्रात खरेदीचा जाेर

मेटल आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला. निफ्टीमध्ये एचडीएफसी बँक टॉप गेनर म्हणून व्यवहार करताना दिसली, तर इंडसइंड बँक टॉप लूसर म्हणून व्यवहार करताना दिसली. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टाटा स्टील आणि ॲक्सिस बँकेचे २८ शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. तर इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक लाल निशापारवर व्यवसाय करताना दिसले. गुरुवारी NSE निफ्टीच्या 50 शेअर्समधील 46 शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले.ट्रेडिंग सत्रात वेदांताच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांनी, तर डाबरच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांनी घसरण झाली.

निफ्टीमध्‍ये HDFC बँक, टायटन , EICHER मोटर्स, एशियन पेंट्स हे टॉप गेनर्स ठरले. तर ONGC, अदानी पोर्ट्स, BPCL, श्रीराम फायनान्स यांनी घसरण अनुभवली.

जीई पॉवर इंडियाच्‍या शेअर्समध्‍ये उल्‍लेखनीय वाढ

आजच्या इंट्राडे ट्रेडिंग सत्रात, भारतातील पॉवर जनरेशन इक्विपमेंट मार्केटमधील प्रमुख खेळाडू, जीई पॉवर इंडियाने त्याच्या शेअर्समध्ये उल्लेखनीय 11.8% वाढ अनुभवली आणि प्रत्येकी 371 रुपयांचा 34 महिन्यांचा उच्चांक गाठला. ही वाढ भरीव ऑर्डरच्या घोषणेनंतर होते आणि शेअरच्या सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात 45% ची प्रभावी एकत्रित वाढ दर्शवते.

१ एप्रिललाही बाजाराने गाठला होता उच्‍चांक

1 एप्रिल रोजी सेन्सेक्सने 74,254.62 अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती. यानंतर तो 74,014 वर बंद झाला. त्याच दिवशी निफ्टीने 22,462 ही सर्वोच्च पातळी गाठली. मुंबई शेअर बाजाराच्या 50 शेअर्सच्या सेन्सेक्सने दिवसभरात 22,529.95 अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT