Latest

नासाच्या चांद्रमोहिमेसाठी १० प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांची निवड

Arun Patil

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : अमेरिकन अंतराळ संस्था नासा ने आपल्या नियोजित चांद्रमोहिमेसाठी 10 प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांची निवड केली आहे. यामध्ये भारतीय मूळ असलेले अनिल मेननही आहेत. मेनन (45) हे अमेरिकन हवाई दलात लेफ्टनंट कर्नल आहेत. स्पेस एक्समध्ये फ्लाईट सर्जन म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.

पोलिओ अभियानांतर्गत एक वर्ष मेनन यांनी भारतात घालविले आहे. अंतराळात आजवर 4 भारतीय दाखल होऊन चुकलेले असले तरी चंद्रावर अद्याप एकही भारतीय अंतराळवीर गेलेला नाही. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर होते. शिवाय भारतीय मूळ असलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आणि राजा चारी अंतराळवीर ठरलेले आहेत.

चांद्रमोहिमेसाठी 10 हजार अर्ज आले होते. प्रशिक्षणासाठी त्यापैकी केवळ 10 जणांची निवड झाली आहे. मेनन यांच्यासह हे सर्व दहाही जण पुढच्या वर्षी टेक्सास येथील जॉन्सन अंतराळ केंद्रावर हजर होतील. दोन वर्षे प्रशिक्षण चालेल.

कोण आहेत अनिल मेनन?

अनिल यांचे वडील भारतीय, तर आई युक्रेनियन आहे. त्यांनी 1999 मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठात न्यूरोबायोलॉजीत पदवी संपादित केली. 2004 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मॅकेनिकल इंजिनियरिंग केले. स्टॅनफोर्डमधून वैद्यकीय शिक्षण घेऊन ते डॉक्टरही बनले. नासा च्या अनेक मोहिमांतून त्यांनी फ्लाईट सर्जन म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT