Latest

सीमा हैदरकडून मोबाईल, पासपोर्ट घेतला ताब्यात

दिनेश चोरगे

लखनौ; वृत्तसंस्था : पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरकडून पोलिसांनी चार मोबाईल, पाच पासपोर्ट आणि दोन व्हिडीओ कॅसेटस् ताब्यात घेतल्या आहेत.

सीमा व तिचा पती सचिन याची दहशतवादीविरोधी पथकाकडून (एटीएस) गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. सचिनवरील प्रेमापोटी चार मुलांसह सीमा भारतात आली आहे. तिने सचिनसोबत लग्न केले आहे. सीमाला मायदेशी पाठवून देण्यासाठी पाकमधील कट्टरपंथीयांकडून हिंदू मंदिर आणि अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट केले जात आहे. सोशल साईटस्वरून भारतीय तरुणांना हनीट्रॅपद्वारे जाळ्यात ओढण्यात येत असल्याच्या घटना अलीकडच्या काळात उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे हेरगिरीच्या संशयावरून सीमाची चौकशी करण्यात येत आहे. तिच्याकडून पासपोर्ट, मोबाईल आणि ध्वनिफिती ताब्यात घेतल्या आहेत.

SCROLL FOR NEXT