Latest

“तुम्हाला ४०० कोटींचा नफा मिळतोय” : केएल राहुलच्‍या अपमानवर सेहवाग भडकला

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदा इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मध्‍ये लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी या संघाचा कर्णधार केएल राहुल याला मैदानावर झापले आणि क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाणल आलं. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही संजीव गोयंका यांच्‍यावर हल्‍लाबोल केला आहे.

हे सर्व व्यापारी…

'क्रिकबझ'शी बोलताना सेहवाग म्‍हणाला की, "हे सर्व व्यापारी आहेत. त्यांना फक्त नफा-तोटा समजतो; पण आयपीएल स्‍पर्धेत सहभागी संघांचा मालकांना कोणताही तोटा होत नाही; मग त्यांना कसाला त्रास होतोय? तुम्हाला 400 कोटींचा नफा मिळत आहे. म्हणजे, हा असा व्यवसाय आहे जिथे तुम्हाला काहीही करायचे नाही. काहीही झाले तरी तुम्ही नफा कमावत आहात. त्यामुळे तुमचे काम फक्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे असले पाहिजे. काय झाले की खेळाडूला वाटेल की आयपीएलमध्ये इतरही फ्रँचायझी आहेत, मी सोडले तर दुसरे कोणीतरी मला घेईल. तुम्ही एखादा खेळाडू गमावला तर तुमची जिंकण्याची शक्यता शून्य आहे."

" खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये किंवा पत्रकार परिषदेत भेटतात तेव्हा त्‍यांना प्रेरीत करण्‍यासाठी मालकांनी बोलले पाहिजे; पण एखाद्‍या मालक संघ व्यवस्थापन सदस्यांपैकी एखाद्या विशिष्ट खेळाडूबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात करतो. प्रशिक्षक आणि कर्णधार संघ चालवतात हे पाहणे गरजेचे आहे. संघ मालकांनी खेळाडू किंवा बॅकरूम स्टाफवर रागावणे टाळावे. असा सल्‍लाही सेहवागने दिला आहे.

संजीवय गोयंकांनी क़ेएल राहुलवर व्‍यक्‍त केली हाेती नाराजी

नकुतेच लखनौ संघाचा सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या मोठ्या पराभव झाला. लखनौने दिलेले १६६ धांवांचे लक्ष्‍य हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 9.4 षटकांमध्‍येच पूर्ण केले होते. या सामन्‍यानंतर गोयंका यांनी मैदानावरच कर्णधार केएल राहुल याच्‍यावर नाराजी व्‍यक्‍त केली. या घटनेच्‍या व्‍हिडिओनंतर क्रिकेट प्रेमीसह माजी क्रिकेटपटूंनी या प्रकारावर संताप व्‍यक्‍त केला होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT