Latest

Holiday Web Series : सुट्टीत कोणत्या Web Series पाहणार? या ५ वेब सीरीज नक्की पाहा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ह्युमन' ते 'मिर्झापूर' या टॉप ५ आकर्षक आणि वेधक वेब-सीरीज ज्या आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अशा अनेक वेब-सीरीज आहेत, ज्यांनी आजवर प्रेक्षकांना मोहित केलं आणि कायम चर्चेत राहिल्या.

मिर्झापूर – ओटीटीवर मिर्झापूरची चर्चा ही कमालीची आहे. या मालिकेत सत्तेच्या राजकारणाचा खेळ अशा पद्धतीने अधोरेखित करण्यात आला आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. पुरस्कार-विजेत्या कामगिरीपासून ते आकर्षक कथेपर्यंत, मिर्झापूरने भारतातील एक उत्तम मालिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

ह्युमन एक्स – चित्रपट निर्माते मोझेझ सिंग यांची वैद्यकीय थ्रिलर मालिका 'ह्यूमन' ही क्लिनिकल ह्युमन ड्रग ट्रायल्सच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी चर्चेत आली होती. मालिकेला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि तिच्या उत्कृष्ट कथा सांगण्याने आणि आकर्षक कथनाने दर्शकांना प्रभावित केलं.

असुर – ओनी सेन दिग्दर्शित, 'असुर' हा एक मनोवैज्ञानिक गुन्हेगारी थ्रिलर आहे जो फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमभोवती फिरतो आणि स्वत:ला असुर कालीचा पुनर्जन्म म्हणणाऱ्या सिरीयल किलरला पकडण्याच्या त्यांच्या शोधात आहे.

पाताळ लोक – 'पाताळ लोक'ने नीरज काबी, जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या अभिनयावर प्रकाश टाकला. या वेब सीरीजने मारेकऱ्याच्या मानसिकतेचा शोध लावला आणि आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची वेगळी बाजू दाखवली.

दिल्ली क्राईम – शेफाली शाह स्टारर क्राईम ड्रामा वास्तविक जीवनातील सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्यानंतरच्या घटनांवर आधारित असलेला ड्रामा आहे. २०१२ साली दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेला योग्यरित्या अधोरेखित केल्याबद्दल समीक्षकांची प्रशंसा मिळाली. शेफालीने मालिकेतील तिच्या अभिनयासाठी अनेक प्रशंसा मिळवली, जी OTT प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून उदयास आली.

SCROLL FOR NEXT