Latest

इराण : हिजाबविरोधी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर सुरक्षा दलाचा गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : इराणमधील महसा अमिना या महिलेला हिजाब व्यवस्थित न घातल्या कारणाने अटक करत अमानुषपणे मारण्यात आले. यानंतर येथील तरूणींनी हिजाबविरोधी निदर्शने केली. येथील बुसान शहरात हिजाबविरोधी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर इराणच्या सुरक्षा दलाने गोळीबार केला. यामध्ये आठ आंदोलकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडल्याची माहिती येथील मानवाधिकार एनजीओ ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने दिली आहे.

काय आहे प्रकरण?

महसा अमिनीला १३ सप्टेंबर रोजी इराण पोलिसांनी हिजाब नीट न घातल्याने तेहरान मेट्रो स्टेशनवर अटक केली होती. यानंतर  तुरुंगात तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यातच ती तीन दिवस कोमात गेली.  यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर इराणी महिलानी उग्र आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.

इराण आणि जगभरातील महिला सार्वजनिक ठिकाणी त्यांचे केस कापत असल्याने आणि मृत्यू पावलेल्या महसा अमिनीसाठी ठिकठिकाणी आंदोलन छेडले जात आहे. या आंदोलनात इराणच्या पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने हिजाब घातल्यामुळे महसा अमिनीचे आयुष्य निर्दयीपणे संपवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे सध्या इराणमध्ये इराणमधील सामाजिक अणि राजकीय वातावरण तापले आहे. यासाठी अनेक महिलांनीदेखील यात सहभाग घेतला आहे. हे आंदोलन हळूहळू रौद्र रूप धारण करत असल्याचे दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT