Latest

गरज स्कीम सर्टिफिकेटची

Arun Patil

एखाद्या कर्मचार्‍याने सलग दहा वर्षांची सेवा पूर्ण केली असेल आणि दहा वषार्र्ंपेक्षा अधिक काळ ईपीएफओमध्ये योगदान दिले असेल, तर तो 58 वर्षांनंतर निवृत्ती वेतन घेण्यास पात्र ठरतो. पण आपल्या नोकरीचा कालावधी दहा वर्षांपेक्षा कमी असेल, तर निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकत नाही. नोकरीची दहा वर्षे पूर्ण हेाण्यासाठी आणि पेन्शनसाठी आपल्याकडे दोन पर्याय राहतात.

पहिला पर्याय : आपण पुढे नोकरी करू इच्छित नसेल, तर पेन्शन विड्रॉल बेनिफिटचा पर्याय निवडू शकता. पीएफशी संबंधित पेन्शन फंडमधील संपूर्ण पैसा काढून सेटलमेंट करू शकता.

दुसरा पर्याय : नोकरीची दहा वर्षे पूर्ण हेाण्यासाठी जेवढा कालावधी शिल्लक आहे, त्या काळात नोकरी करणे आणि दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणे. एकंदरीत भविष्यात उर्वरित काळात नोकरी करत दहा वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागेल. अशा स्थितीत नवीन नोकरी करत मागच्या पेन्शन खात्याला नवीन नोकरीचे उत्पन्न जोडू शकतो. अशा रीतीने दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईल आणि पेन्शनसाठी पात्र ठराल. अर्थात दुसर्‍या पर्यायात स्कीम सर्टिफिकेटची गरज भासते. स्कीम सर्टिफिकेट म्हणजे काय ते जाणून घेऊ.

स्कीम सर्टिफिकेट म्हणजे काय?

स्कीम सर्टिफिकेट पेन्शन ही एका पॉलिसीप्रमाणेच असते. यानुसार आपण जॉब बदलल्यास पेन्शन ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. पेन्शनसाठी दावा करण्यासाठी या प्रमाणपत्राची गरज भासते. म्हणजे दहा वर्षांपेक्षा कमी काळात पीएफमध्ये योगदान दिले असेल, तर पेन्शन सेवा सुरू ठेवण्यासाठी स्कीम सर्टिफिकेटची गरज भासते. परंतु ते असणे बंधनकारक नाही.

कधी गरज पडते?

नियमानुसार, पीएफ अंशधारक हा नोकरी बदलतो तेव्हा त्या पीएफ खात्याला नव्या कंपनीत ट्रान्सफर करायला हवे. ही सुविधा ईपीएफओच्या संकेतस्थळावर आहे. मात्र नव्या कंपनीत पीएफची सुविधा नसेल तर पेन्शनसाठी स्कीम सर्टिफिकेटची मागणी करू शकता. याप्रमाणे अन्य कंपनीत रुजू झाल्यानंतर पेन्शन अकाऊंटला स्कीम सर्टिफिकेटच्या मदतीने जोडले जाऊ शकतो. ज्या मंडळीने दहा वर्षांपर्यंत पीएफमध्ये योगदान दिलेले असेल आणि पुढे नोकरी करण्याचा विचार करत नसतील, तर तेदेखील 50 ते 58 वयोगटात पेन्शन घेण्यासाठी स्कीम सर्टिफिकेट घेऊ शकतात.

स्कीम सर्टिफिकेट कसे घेता येते?

स्कीम सर्टिफिकेट घेण्यासाठी 10 सी भरण्याची गरज असते. ईपीएफओच्या संकेतस्थळावरून हा अर्ज डाऊनलोड करू शकतो आणि तो अर्ज जवळच्या ईपीएफओ ऑफिसमध्ये जमा करू शकता. त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्स जसे जन्मतारखेचा दाखला, कॅन्सल चेक, कर्मचार्‍यांच्या मुलांची नावे, त्याचे विवरण, कर्मचार्‍यांच्या मृत्यूच्या स्थितीत मृत्यू प्रमाणपत्र, वारसदार अर्ज भरत असेल तर वारस प्रमाणपत्र आणि एक रुपयाचे स्टँप तिकीट आदी कागदपत्रे जमा करावी लागतात.

जगदीश काळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT