Latest

Tharla Tar Mag! series : हनीमून नव्हे तर फ्रेंडमून; हनीमूनसाठी सायली-अर्जुन माथेरानला

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ठरलं तर मग' मालिकेला ( Tharla Tar Mag! series ) प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून नंबर वन वर आहे. लवकरच प्रेक्षकांना अर्जुन-सायलीसोबत माथेरान फिरण्याची संधी मिळणार आहे.

संबंधित बातम्या 

लग्नानंतर अर्जुन-सायलीने हनीमूनला जावं अशी अर्जुनच्या आईची इच्छा होती. आईच्या सांगण्यावरुन हो- नाही म्हणता म्हणता माथेरानच्या प्लॅनवर शिक्कामोर्तब झालं आहे. सुरुवातीला सायलीचा या ट्रीपला नकार होता. मात्र, अर्जुनने आपल्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे हनीमून नाही तर या ट्रीपला फ्रेंडमून म्हणून जावूया असं सांगून त्याने सायलीचं मन वळविलं. माथेरान सफरीमध्ये नेमक्या काय गंमती-जंमती होणार यांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

माथेरानमधल्या शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगताना जुई गडकरी म्हणाली की, 'अतिशय सुंदर अनुभव होता. सेटच्या बाहेर जाऊन आम्ही पहिल्यांदाच शूट केलं. मी मुळची कर्जतची. त्यामुळे लहानपणी अनेकदा माथेरानला फिरायला जायचे वाटायचे. लहानपणीच्या सगळ्या आठवणी या शूटिंगमुळे जाग्या झाल्या. आमचे खूप सारे चाहतेही आम्हाला इथे भेटले. काहींची तर मालिकेत काम करण्याची इच्छाही माथेरान शूटिंगमुळे पूर्ण झाली आहे. खूप आपुलकीने आणि आदराने माथेरानला आमचं स्वागत झालं. खाण्यापिण्याची चंगळ होतीच. पण, मला सर्वात कौतुक वाटतं ते आमच्या तंत्रज्ञांचं. शूटिंगचा ताफा सांभाळताना त्यांची खरी कसरत होत होती. सायली-अर्जुनवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करतात.' ( Tharla Tar Mag ! series )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT