Latest

मूळ नाटकातील नवा नथुराम गोडसे साकारणार अभिनेता सौरभ गोखले

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : निर्माते उदय धुरत त्यांच्या माऊली प्रॉडक्शन्सचे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक नव्याने रंगभूमीवर येत आहे. 'नथुराम'च्या भूमिकेचे आव्हान कोण पेलणार याविषयी कमालीची उत्सुकता होती. नथुरामच्या भूमिकेसाठी सुमारे २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स या नाटकाचे पुनर्दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक विवेक आपटे आणि उदय धुरत यांनी घेतल्या. त्यानंतर अभिनेता सौरभ गोखलेची निवड झाली. सौरभ ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारणार, याकडे नाट्यरसिकांसह नाट्यसृष्टीचे लक्ष लागले असून नाटकाच्या तालमी मुंबईत सुरु असून लवकरच हे ओरिजनल नाटक रसिकांना पहायला मिळणार आहे असे निर्माते उदय धुरत म्हणाले.

३० नोव्हेंबरला सुनावणी

अभिनेते शरद पोंक्षे यांनी रंगभूमीवर आणलेल्या नव्या नाटकाच्या नावात 'नथुराम गोडसे बोलतोय' ऐवजी 'नथुराम गोडसे' असा बदल केल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली होती. त्यावर 'नथुराम गोडसे' या नव्या नावात यापुढे नवीन काही जोडू नका, असे निर्देश न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी शरद पोंक्षे यांना दिले होते. या प्रकरणी ३० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

माऊली भगवती प्रॉडक्शन्सच्या नव्या नाटकातील संहिता, सादरीकरण व ट्रेडमार्कचे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या मूळ नाटकाशी साधर्म्य आहे. त्यामुळे आमच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करत 'माऊली प्रॉडक्शन्स'चे मालक व निर्माते उदय धुरत यांनी माऊली भगवती प्रॉडक्शन्सचे मालक प्रमोद धुरत व अभिनेते शरद पोंक्षे यांच्याविरूद्ध दावा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT