Latest

सातारा : ठोसेघर, सज्जनगड, केळवली हाऊसफुल्ल, सज्जनगडावर वाहनांच्या रांगा

स्वालिया न. शिकलगार

सातारा – पुढारी वृत्तसेवा : विकेंड पण आषाढीची सांगता त्यामुळे साताऱ्याच्या पश्चिमेला अक्षरश: पर्यटकांची मांदियाळी झाली होती. पर्यटन स्थळावर तसेच सज्जनगडावर वाहनांच्या रांगा तर धबधबा गॅलरी पायरी मार्गावर पर्यटकांची गर्दी झाली होती. या गर्दीतून आणि पावसाच्या सरीतून पर्यटक धबधबा पाहण्याचा आनंद घेत होते.

रिमझिम पाऊस, हिरवेगार डोंगर अन् त्यातून फेसाळणारे धबधबे असं अल्हाददायक वातावरण म्हटलं की, मान्सून पर्यटकांचे पाय वळतात ते साताऱ्याच्या पश्चिमेला. ठोसेघर ,चाळकेवाडी सज्जनगड केळवली भांबवली आणि कास पठार या हिरव्यागार डोंगरांगात रविवारी दिवसभर पर्यटकांची रेलचेल होती.

ठोसेघर सज्जनगड परिसरात वाहनांच्या दोन-दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. ठोसेघर धबधबा गॅलरी पायरी मार्ग आणि गुहा या ठिकाणी पर्यटक रांगेत ताटकळत उभे राहिले होते.

सध्या मान्सून पर्यटन बहरले आहे. त्यातच शनिवार, रविवारची सुट्टी आणि आखाडीची सांगता यामुळे पर्यटनासाठी सहकुटुंब तसेच मित्र परिवारांसहित बाईक रॅली आणि गाड्यांच्या जणू रॅली निघाल्या.

SCROLL FOR NEXT