Latest

फुलो भरी पाचगणी! निसर्ग नटला, पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज (व्हिडिओ)

स्वालिया न. शिकलगार

पाचगणी (सातारा) : इम्तियाज मुजावर : महाराष्ट्राचं नंदनवन थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरिस्थान पाचगणी परिसरातील निसर्ग श्रावण महिन्यानंतर चांगलाच हिरवाईने नटला आहे. श्रावण आणि भाद्रपद महिन्यानंतर पाचगणी भिलार परिसरातील निसर्ग व या परिसरातील पर्वतरांगा रंगीबेरंगी रानफुलांनी व हिरव्यागार गवतांच्या गालिचांनी हा निसर्ग पूर्णत: बहरून निघतो. निसर्गाची अद्भुत लीला सावन भाद्रपद महिन्यानंतर या ठिकाणी वर्षानुवर्ष पहावयास मिळते. उंच पर्वतरांगा त्यामधून हिरवेगार गवतांचे गालीचातून रंगीबेरंगी फुले डोकावू लागतात. येणाऱ्या पर्यटकांना आपल्या सौंदर्याकडे पाहण्यासाठी मजबूर करतात. पाचगणी भिलार महाबळेश्वरचा निसर्ग सध्या चांगलाच बहरला आहे. वास्तविक, पाचगणी महाबळेश्वरचे पर्यटन पावसाळ्यातदेखील चांगलेच भरभरून आले होते. केवळ उन्हाळ्यातच पाचगणी महाबळेश्वरला पर्यटक न येता आता बारा महिने या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पर्यटक हजारोच्या संख्येने भेट देत असतात.

यातच पाचगणी येथील पांगारी भिलार कासवंड टेबल लँड सिडनी पॉईंट पारसी पॉईंट हा परिसर हिरव्यागार निसर्गाने भरगच्च झाला आहे. येणारा प्रत्येक पर्यटक या हिरव्यागार निसर्गाचा फोटो व्हिडिओ टिपल्याशिवाय आपल्या घरी जात नाही. पांगरीतून धोम धरणाचा अथांग निळा जलसागर पाहिल्यानंतर 'मन उधान झाले रे' ही प्रचिती येते. निसर्गाची अनेक गाणी ओठांवर येतात. पाचगणीतील संजीवन विद्यालयाचं मैदानाचे पठार त्याचबरोबर अंजुमन इस्लाम पठार भिलारचे पठार हे सर्व रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे.

फुलांचे कास फ्लॉवर व्हॅली म्हणून ओळखली जाते. त्याचपाठोपाठ पाचगणी भिलार परिसरात फ्लॉवर व्हॅली नव्याने उदयास येऊ लागली आहे. पाचगणी परिसरातील रस्तेदेखील मिकी माऊस लव्हेंडर व पांढऱ्याशुभ्र विविध रंगीबेरंगी फुलांनी दुतर्फा सजले आहेत. सध्या रंगीबेरंगी फुलांची कास फ्लॉवर व्हॅली नुकतीच सुरू झाली आहे. मात्र पाचगणीत पिवळ्या शुभ्र फुलांनी परिसरातील सर्वच पठार बहरला आहे. त्यामुळे कास पठारावर फ्लॉवर व्हॅली पाहणाऱ्या पर्यटकांनी पाचगणीत देखील भेट द्यावी व रंगीबेरंगी फुलांचा गालिचा व आच्छादलेले पठार नक्की पहावे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT