Latest

Satara Crime News : कराडमध्‍ये तरुणाचा चाकूने भोसकून खून, हल्लेखोर पसार

मोनिका क्षीरसागर

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड (जि- सातारा) येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा  चाकूने वार करून तरुणाचा खून करण्यात आला. शनिवारी (दि.२) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून, संशयित हल्लेखोर फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Satara Crime News) शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील कार्वे नाका येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शुभम चव्हाण याच्यावर अज्ञाताने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. यानंतर संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Satara Crime News)

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस उपरिक्षक राजू डांगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. संशयित हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. (Satara Crime News)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT