Latest

sarso ka saag ‘सरसों का साग’ ची रेसिपी २,५०० वर्षांपुर्वीची!

Arun Patil

नवी दिल्ली : पंजाबमधील लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये 'मक्के दी रोटी' आणि 'सरसों का साग'चा (sarso ka saag) समावेश होतो. पंजाबी लोकांना केवळ मांसाहारच आवडतो असे नाही तर असे पदार्थ, लस्सी, पनीरच्या भाज्याही आवडतात. पाच नद्यांच्या या प्रांताची भूमीही सुपीक असल्याने तिथे वेगवेगळ्या पिकांचे उत्पादनही मोठेच होत असते. पंजाबी लोकही खाण्याचे शौकिन असतात आणि जगभर पंजाबी डिशेस प्रसिद्धही आहेत. त्यामध्ये मक्याच्या या रोटीचा तसेच मोहरीच्या भाजीचा हटकून समावेश होतो. 'सरसों का साग'ची ही रेसिपी तब्बल 2,500 वर्षे जुनी आहे, हे विशेष!

चुलीवरील 'मक्के दी रोटी' आणि 'सरसों का साग'(sarso ka saag)चे शौकिन अनेक आहेत. 'सरसों का साग' शिजवण्यासाठी 'देसी घी' म्हणजेच साजूक तुपाचा यथेच्छ वापर होतो. तुपात न्हालेले हे दोन्ही पदार्थ विशेषतः हिवाळ्यात खाणे अधिक पसंद केले जाते. अनेकांना वाटत असेल की, ही डिश शे-दोनशे वर्षे जुनी असेल; पण तिला सुमारे अडीच हजार वर्षांपासूनचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. 'सरसों का साग' या पदार्थाचा उल्लेख प्राचीन सूत्र ग्रंथांमध्ये तसेच आयुर्वेदावरील प्राचीन ग्रंथांमध्येही मिळतो. त्याकाळी हे शिजवण्यासाठी मोहरीच्या बिया आणि तेल यांचा वापर केला जात असे. त्यामध्ये वरून तुपाची धार सोडली जात असे.

भारतात सोळाव्या शतकात मक्याची शेती केली जाऊ लागली, असे म्हटले जाते. मक्याची रोटी (sarso ka saag) आरोग्यासाठी लाभदायक असते. गरीब व श्रीमंत अशा सर्वांचाच हा आहार आहे. फाळणीवेळी अनेकांच्या पोटाची भूक या 'मक्के दी रोटी'नेच भागवली होती. त्यानंतर अनेकांनी अशा रोटी व सागचा वापर विक्रीसाठीही सुरू केला व त्याची लोकप्रियता जगभर पसरली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT