Latest

Mumbai on high alert : ‘धोकादायक’ सर्फराज मुंबईत पोहोचला ‘एनआयए’चा अलर्ट : सुरक्षेत वाढ

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन आलेला सर्फराज मेमन नावाचा अत्यंत धोकादायक अतिरेकी मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त आहे.

मेमन मुंबईत पोहोचल्याचे समजताच अत्यंत दक्ष राहण्याची सूचना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए'ने मुंबई पोलिसांना ई- मेलद्वारे केली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रमुख धार्मिक स्थळे, ताजमहाल पॅलेस हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर हाजी अली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

सर्फराज मेमन मूळचा मध्य प्रदेशचा असून, तो फार काळ मुंबईत राहणे खूपच धोकादायक ठरू शकते, असेही एनआयएने मेलमध्ये म्हटले आहे. या संशयिताची कागदपत्रेही एनआयएने मुंबई पोलिसांना पाठवली आहेत. यात त्याचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि अन्य तपशीलही देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांशी संवाद साधून आणखी माहिती घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT