Latest

Sara- Kartik : ब्रेकअपनंतर कार्तिक- सारा पुन्हा एकत्र; उदयपूरमधून फोटो समोर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'शहजादा' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिकने कोणतीही कसूर कमी ठेवलेली नाही. दरम्यान कार्तिक आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ( Sara- Kartik ) दोघेजण एकत्रित स्पॉट झाले. यामुळे चाहत्यांनी कार्तिक- सारा पुन्हा रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले.

सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर उदयपूर येथील एका हॉटेलमधील दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत कार्तिकचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. तर दुसऱ्या फोटोत सारा- कार्तिक एकमेंकाशी बोलताना स्पष्टपणे दिसत आहेत. कार्तिक चेक शर्ट तर सारा व्हाईट रंगाच्या क्रॉप टॉप आणि ब्लॅक टाइट्समध्ये एकदम हटके दिसली. यावेळी खास करून ( Sara- Kartik ) दोघेजण एकाच हॉटेलमध्ये असल्याने नेटकऱ्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले आहेत.

याआधी कार्तिकने उदयपूरमधील एका तलावाच्या किनाऱ्यावरील एक फोटो शेअर केला होता. यात तो स्पष्टपणे दिसत नव्हता. मात्र, त्याच्यासोबत बोट राईडस दिसत होता. सारा आणि कार्तिकच्या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात नेटकऱ्यांनी ब्रेकअपनंतर पुन्हा एकत्रित आल्याचे बोलले जात आहे.

एका युजर्सने कार्तिक- साराची जोडी क्यूट आहे. जर ते पुन्हा एकत्रित आले तर कोणतीही जोडी त्यांच्याशी बरोबरी करू शकणार नाही'. तर दुसर्‍या एकाने 'काहीही बदललेले नाही असे वाटते, पुन्हा एकत्रित दिसल्याने दोघांची केमिस्ट्री चांगली दिसली आहे, असे म्हटलं आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान २०२० मध्ये इम्तियाज अली यांच्या 'लव्ह आज कल' चित्रपटात एकत्रित दिसले होते. यानंतर ही जोडी चाहत्यांना खूपच आवडली. याच दरम्यान सोशल मीडियावर दोघेजण एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र, 'कॉफी विथ करण' सीझन ७ मध्ये करण जोहरने या घटनेची पुष्टी केली आणि दोघांचे ब्रेकअप झाल्याची माहिती दिली.

हेही वाचा :

(PHOTO : viralbhayani INSTGRAM वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT