Latest

Zara Hatke Zara Bachke : फुल्ल पैसा वसुल! सारा-विकीच्या चित्रपटाचा दुसऱ्या दिवशीही डंका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : द केरल स्टोरी आणि फास्ट एक्सच्या कलेक्शन दरम्यान बीच विक्की कौशल -सारा अली खानचा चित्रपट 'जरा हटके जरा बचके' रिलीज झालाय. (Zara Hatke Zara Bachke ) पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे जबरदस्त कलेक्शन पाहायला मिळाले. त्यामुळे वीकेंडला कमाईत वाढ झालेली दिसण्याची शक्यता आहे. आता दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. पहिल्या दिवशीच्या तुलनेत ही कमाई अधिक पाहायला मि‍‍ळाली. (Zara Hatke Zara Bachke )

सूत्रांच्या माहितीनुसार, जरा हटके जरा बचकेने दुसऱ्या दिवशी ६.२ कोटींची केली. त्यानंतर एकूण कमाई १२.२० कोटी झालीय. पहिल्या दिवशी चित्रपटाने ६ कोटींची कमाई केली होती. या चित्रटाला समीक्षकांकडून वाहव्वा मिळालीय.

हा चित्रपट केवळ ४० कोटींमध्ये तयार झाला आहे. यामध्ये ईनामउलहक, नीरज सूद, राकेश बेदी, शारिब हाशमी, सुष्मिता मुख़र्जी सपोर्टिंग रोलमध्ये आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.

अनेक अन्य चित्रपटांपेक्षा दमदार प्रदर्शन

विकी-साराचे मागील चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. दीर्घकाळानंतर त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालाय. तिकिटाच्या किमतीही कमी असल्याचे म्हटले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT