Latest

Sanya Malhotra : द स्टार्स ऑन फायर टूर यूके 2023 साठी सान्याची जोरदार तयारी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कठल चित्रपटाच्या यशानंतर सान्या मल्होत्रा​​कडे अजून तीन मोठे चित्रपट रिलीज होणार असल्याचे समजते. लवकरच तिचा यूकेमध्ये थेट परफॉर्मन्स होणार असून सगळेच तिच्या टूरची वाट पाहत आहे. (Sanya Malhotra) नेटफ्लिक्सवर भारतात प्रदर्शित होणाऱ्या टॉप १० चित्रपटांमध्ये तिचा कठल हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तसेच सान्या मल्होत्रा ​​तिच्या सुपरहिट ठरलेल्या मल्याळम चित्रपटाचा द ग्रेट इंडियन किचन "चा अधिकृत हिंदी रिमेक पूर्ण करत आहे. ती "द स्टार्स ऑन फायर टूर यूके २०२३" यासाठी तयारी करताना दिसतेय. (Sanya Malhotra)

मल्होत्राच्या विविध भूमिका खूप महत्वपूर्ण ठरत आहेत. २०१६ मधील दंगल या तिच्या पहिल्या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि तिच्या सुपरहिट अभिनयाने तिची वेगळी अनोखी निर्माण झाली. तिने बधाई हो, पटाखा, मीनाक्षी सुंदरेश्वर आणि पगलैट या अनेक चित्रपटांमधील अभिनायने सगळ्यांची मने जिंकली.

"स्टार्स ऑन फायर टूरचा" एक भाग होणार असून ती यात सादरीकरण करणार आहे. ज्यात हृतिक रोशन आणि वाणी कपूर देखील आहेत. लंडन आणि लीड्स येथे १ आणि २ सप्टेंबर रोजी हा खास सोहळा पार पडणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT