Latest

Sanya Malhotra : शाहरुख -आमिर खानच्या यशाबद्दल सान्या मल्होत्रा म्हणाली, ‘यशाचे रहस्य..’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'दंगल गर्ल' फेम आणि बॉलिवूड अभिनेता सान्या मल्होत्राने ( Sanya Malhotra ) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत नुकतेच दोन मोठ्या स्टार्ससोबत भारदस्त अभिनय साकारलाय. सान्याने पहिल्यांदा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत 'दंगल' चित्रपटात त्यानंतर ती बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबतच्या 'जवान' चित्रपटात दिसणार आहे. या दोन्ही बड्या स्टार्ससोबत काम करण्याचा अनुभव आणि त्याच्या यशाचे रहस्य याबद्दल सान्याने नुकताच खुलासा केला आहे.

सान्याने ( Sanya Malhotra ) तिच्या करिअरमध्ये केलेल्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि शाहरूख खान यांच्यासोबतच्या कामाचा अनुभव आणि त्याच्या यशाचे रहस्य याबद्दल सांगितले आहे. यात तिने म्हटलं की, ' दोन्ही स्टार्स ज्या प्रकारे तयार होवून वेळेवर सेटवर यायचे ते पाहून ती खूपच प्रभावित झाले. यावरून दोन्ही स्टार्स त्यांच्या कामासाठी सजगता पाहायला मिळाली. वेळेचे ते काटेकोरपणे पालन करतात. कामाबद्दलची त्याची उत्कंटा पाहून मला त्याचा खूपच अभिमान आहे. दोघांच्यातील समान एक गोष्ट म्हणजे, कामाप्रती असणारी प्रामाणिकपणा, कष्ठाळूवृत्ती, वेळेचे महत्व यासारख्या अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. दरम्यान त्याच्या या यशामागील असणारे कष्टाचे रहस्य समजून घेण्याची संधीही मिळाली. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचेही तिने म्हटलं आहे.'

'जवान' हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी चाहत्याच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि सान्यासोबत नयनतारा आणि विजय सेतुपती यानी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ४ वर्षानंतर शाहरूख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'जवान'शिवाय सान्या मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सान्यासोबत बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि फातिमा सना शेख यांनी भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT