Latest

यवत ग्रामस्थ देणार वारकऱ्यांना पिठलं भाकरीचा आस्वाद

अमृता चौगुले

यवत: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यांच्या स्वागतासाठी यवत ग्रामस्थ सज्ज झाले असून शनिवार २५ जून रोजी सायंकाळी तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी येणार आहे. शनिवारी सकाळपासूनच यवत ग्रामस्थांची पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना भोजनासाठी देण्यात येणाऱ्या पिठलं भाकरी तयार करण्याची लगबग सुरु केली.

यवत गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात सुमारे 350 किलो बेसनचे पिठलं आणि 500 किलो बाजरीच्या भाकरी करण्यास सकाळी 11 पासूनच सुरुवात करण्यात आली. शिवाय यवत परिसरातील वाड्या वस्तीवरून भाकरी आणि पिठलं येणास सुरुवात झाली आहे. यवत मुक्कामी असणाऱ्या पालखी सोहळ्यात पिठलं भाकरी देण्याची शेकडो वर्षाची परंपरा यावर्षी देखील पाहायला मिळत आहे. सायंकाळी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची आरती होइपर्यंत भैरवनाथ मंदिर परिसरात असणारी संपूर्ण खोलीच भाकरींनी भरून जाते. आरती झाल्यानंतर उपस्थित सर्व वारकरी मंडळींना पिठलं भाकरी जेवणासाठी यवत ग्रामस्थांच्यावतीने देण्यात येते.

SCROLL FOR NEXT