लेह (लडाख) : रामायण काळात मेघनादाच्या मार्यात जखमी झालेल्या लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने डोंगरासह आणलेली संजीवनी वनस्पती ही हिमपर्वतांवर आढळणारी सीबकथॉर्न वनस्पती असून, ती एक आश्चर्यकारक औषधी असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
ऑक्सिजनपासून ते शरीराच्या अन्य 7 मुख्य गरजा पूर्ण करण्याची क्षमता या वनस्पतीत असल्याचेही संशोधनातून समोर आले आहे. लाहौल, स्पिती, चांगथांग, सिंधू, द्रुवा, दारस, सुरू आणि झांस्कर या हिमालयीन नद्यांच्या काठांवर सीबकथॉर्नची काटेरी झुडपे प्रमाणात आढळतात. लेह येथील कजरी, दिहार, सोवारिग्पा या वैज्ञानिक संस्थांसह देश-विदेशातील जंगली झाडे आणि वनस्पतींवर संशोधन करणार्या 50 संशोधकांच्या वेगवेगळ्या संशोधनानी यावर शिक्कामोर्तब केले आहे, हे विशेष! लेहमधील संस्थांचे संशोधन लवकरच वर्ल्ड रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार आहे.
संजीवनी औषधावर संशोधनात भारत मागे पडला; पण चीन, भूतान आणि रशियाने त्यावर काम सुरू केले आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ग्रीन इंडिया मिशनमध्ये या वनौषधींच्या मोठ्या प्रमाणावर लागवडीची योजना आखली आहे.