Latest

तुरुंगातून सुटल्यानंतर आप नेते संजय सिंह यांनी घेतली सुनीता केजरीवाल यांची भेट

backup backup
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले आपचे नेते आणि खासदार संजय सिंह जामीन मिळाल्यानंतर तिहार तुरुंगातून बाहेर पडले.जवळपास सहा महिने ते तुरुंगात होते. संजय सिंह यांनी बुधवारी तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी संजय सिंह यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. भेटीदरम्यान त्यांनी काही वेळ चर्चा केली. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल भावुक झाल्या होत्या.
संजय सिंह यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना जामीन मिळण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे म्हटले होते. संजय सिंह यांची सुटका झाल्यानंतर तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून संजय सिंह म्हणाले की, "ही वेळ संघर्ष करण्याची आहे. आमच्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. मला विश्वास आहे की एक दिवस या कारागृहातुन ते बाहेर येतील. म्हणून संघर्ष करण्याची ही वेळ आहे." असेही ते म्हणाले.
SCROLL FOR NEXT