Latest

Sanjay Singh: आप नेते संजय सिंग यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर ईडीचे छापे

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आप नेते खासदार संजय सिंग यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने बुधवारी (दि.२४) छापे टाकले. आपले सहकारी अजित त्यागी तसेच सर्वेश मिश्रा यांच्या ठिकाणांवर ईडीची धाड पडली असल्याची माहिती स्वतः संजय सिंग यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिली आहे.

मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना काही महिन्यांपूर्वी तपास संस्थांनी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मद्य धोरण घोटाळ्यात त्यागी आणि मिश्रा यांना फायदा झाला असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे, त्यातून हे छापे टाकण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान ताज्या छापेमारीनंतर संजय सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांची दादागिरी शिगेला पोहोचली असल्याची टीका केली आहे. मोदी यांच्या हुकुमशाहीविरोधात मी लढत आहे. ईडीची बनावटगिरी देशासमोर आली आहे. माझ्याकडून काही मिळाले नाही तर अजित त्यागी आणि सर्वेश मिश्रा यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. सर्वेश यांच्या वडिलांना कॅन्सर आहे, अशावेळी ही कारवाई होत आहे. कितीही अन्याय करा, आमची लढाई थांबणार नाही, असेही खा. संजय सिंग यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT