राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी सोमय्या यांनी ५८ कोटी लाटल्याचा आरोप केला होता. मात्र, किरीट सोमय्या यांचे आता २०१३ चे ट्विट व्हायरल झाले आहे. त्याच ट्विटवरून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे.
त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मी ५८ कोटींचा हिशेब मागितला होता, प्रकरण १४० कोटींपर्यंत पोहोचले आहे. प्रिय देशवासियांनो क्रोनॉलॉजी समजून घ्या, गडबडीवर गडबडी आहेत. राऊत यांनी केंद्राच्या मदतीने आमचे फोन टॅप झाल्याचा दावा केला आहे.
मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी किरीट सोमय्यांचे षड्यंत्र सुरु आहे. त्यासाठी केंद्रात प्रेझेंटेंशन सुरु आहे. भाजपच्या ५ लोकांनी हे प्रेझेंटेंशन तयार केले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करुन मुंबईत केंद्राचे राज्य आणायचा प्रयत्न सुरु आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याच्या कटकारस्थानाचा सोमय्या हे सूत्रधार आहेत. त्यांना मुंबईतून बिल्डर मदत करतो, जो भाजपचा फायनान्सर आहे हे आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रातील धनदांडग्या व्यक्तींचे नेतृत्व सोमय्या करत आहेत, असे आरोप संजय राऊत यांनी केले.
आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी जमा केला होता. त्या निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. सोमय्या यांच्या नीलमनगरमधील कार्यालयात आयएनएस विक्रांतसाठी जमा झालेला पैसा एकत्र करण्यात आला. त्यानंतर तेथून तो वितरीत करण्यात आला, तसेच पीएमसी बँकेत या काळ्या पैशाला व्हाईट करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
हा पैसा सोमय्या यांनी निवडणुकीत वापरला. पीएमसी बँकेतून हा पैसा व्हाईट करीत चलनात आणण्यात आले आणि नील किरीट सोमय्यांच्या व्यवसायात उपयोगात आणण्यात आले, असा आरोपदेखील राऊत यांनी केला. पैसा जमा करण्यासाठी 711 मोठे बॉक्सेस तयार करण्यात आले होते. हा सगळा प्रकार मनी लाँडरिंगचा असू शकतो. ईडी ही केंद्रीय संस्था भाजपची बटीक नसेल तर या प्रकरणी सोमय्यांवर कारवाई करतील, असा टोलाही राऊत यांनी हाणला. या प्रकरणाचे पुरावे मागितले जात आहेत. परंतु, गोळा करण्यात आलेल्या पैशांचा व्यवहार अगोदर दाखवा. त्यानंतर पुरावे देईन, असे आव्हानही राऊत यांच्याकडून देण्यात आले आहे.
आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली निधी गोळा करून या रकमेचा अपहार केल्याप्रकरणातील तक्रारीवरून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक नील यांच्यावरही ट्रॉम्बे पोलिसांनी भादंवि कलम 406, 420, 34 अन्वये बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. माजी सैनिक बबन भोसले (53) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जनतेकडून जमवलेला निधी राज्यपालांच्या सचिवांकडे जमा झालेला नाही, अशी माहिती माहिती अधिकाराअंतर्गत देण्यात आल्याचे कार्यकर्ते धीरेंद्र उपाध्याय यांनी उघडकीस आणली होती. त्यानंतर भोसले यांनी तक्रार दाखल केली.
हे ही वाचलं का ?