Latest

संजय राऊत ईडी कार्यालयातून बाहेर; १० तास झाली चौकशी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना खासदार संजय राऊत यांची गेल्या १० तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांची गेल्या १० तासांपासून चौकशी सुरू होती. दरम्यान, ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीला सहकार्य केले असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत आज १२ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केले आहे की, "मी पळपुटा नाही, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार. तेवढी माझ्यात हिंमत आहे"

ईडी कार्यालयात दाखल होण्यापुर्वी संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत त्यांनी सांगितले होते की, "मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे." त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहनही केले आहे की, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयात जमू नये. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना २७ जूनला समन्स बजावले होते, पण संजय राऊत नियोजित दौऱ्यामुळे ईडीसमोर चौकशीला हजर राहू शकले नाहीत. त्यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी उपस्थित राहून विनंती अर्ज सादर केला होता.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT