Latest

Sangli : वारणा नदीच्या पाणी पातळीत घट

backup backup

समडोळी : वारणा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळेेे समडोळी (ता. मिरज) येथे पाणीप्रश्न निर्माण होऊ लागला आहे. संबंधित विभागाने तत्काळ वारणेच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी होत आहे. बारमाही वाहणारी नदी म्हणून वारणा नदीची ओळख आहे. नदीत पोहण्यासाठीही सर्व वयोगटातील व्यक्तींची वर्दळ सुरू असते. तथापि उपलब्ध पाण्यावर डुबकी मारून पोहण्याची वेळ आली आहे. नदी पात्रात पाटबंधारे विभागाकडून पाणी न सोडल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. वारणा नदीच्या पाण्यावर पाणीपुरवठा संस्था टिकून आहेत. येत्या चार ते पाच दिवसात पाटबंधारे विभागामार्फत पाणी न सोडल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची वेळ शेतकरीवर्गावर येण्याची भीती आहे.

SCROLL FOR NEXT