Latest

सांगली : नववधूच्या आत्महत्येनंतर प्रियकराचीही विष पिऊन आत्महत्या

अविनाश सुतार

जत: पुढारी वृत्तसेवा : एकुंडी (ता.जत) येथे सहा दिवसापूर्वीच विवाह झालेल्या तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अश्विनी गजानन माळी (वय २२, मूळ रा. सलगरे, ता. मिरज, सध्या रा. एकुंडी, ता. जत) व लक्ष्मण संभाजी शिंदे (वय २१, रा. एकुंडी, ता. जत ) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनीही एकुंडी येथील आपआपल्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. मयत अश्विनी हिचा विवाह एक जूनला झाला होता.

याबाबतची अधिक माहिती अशी, अश्विनी माळी ही मूळची सलगरे येथील असून सध्या ती एकुंडी येथे राहण्यास आहे. एकुंडी येथीलच लक्ष्मण शिंदे याच्याबरोबर अश्विनी हिचे प्रेमसंबंध होते. अश्विनी हिचे एक जूनला लग्न झाले होते. मिरज येथून अश्विनी ही एकुंडी येथे दोन दिवसापूर्वी आली होती. सोमवारी दुपारी अश्विनी व लक्ष्मण यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. अश्विनी व लक्ष्मणला अस्वस्थ होत असल्याने तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात आणले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अश्विनी ही सहा दिवसांपूर्वी माहेरी आली होती. त्यानंतर दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली. माहेरी आल्यानंतर लक्ष्मणबरोबर तिने फोनवर चर्चा करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा होती.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT