Latest

‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाच्या मुद्द्यावर गेले काही महिने महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे-पाटील यांची कहाणी आता "संघर्षयोद्धा"- मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून मांडली जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. २६ एप्रिल रोजी "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. शिवाजी दोलताडे यांचे दिग्दर्शन आहे. डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा आहेत.

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

sangharsha yodhaa Manoj jarange patil

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेला एल्गार धमाकेदार "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाच्या टीजरमधून दिसत आहे. लाखोंची गर्दी, उधळला जाणारा गुलाल यामुळे आंदोलनाचा माहौल चित्रपटातही टिपला गेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मिळालेला तुफान प्रतिसाद या चित्रपटालाही मिळणार हे या टीजरमधून स्पष्ट होत आहे.

SCROLL FOR NEXT