Latest

Sangeeta Fogat : दिल्ली पोलिसांनी ‘संगीता फोगाटला’ कुस्ती महासंघाच्या कार्यालयात नेले आणि…

backup backup
नवी दिल्ली, ९ जून, पुढारी वृत्तसेवा, Sangeeta Fogat : लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. शुक्रवारी पोलीस पथकाने तक्रारदार कुस्तीपटू संगीता फोगाट सोबत कुस्ती महासंघाचे कार्यालय गाठले होते. 'क्राईम सीन रिक्रिएट' करण्यासाठी पोलीस फोगाट यांना महासंघाच्या कार्यालयात घेऊन गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, फोगाट (Sangeeta Fogat) यांच्यासह पोलीस पथकाने बृजभूषण सिंह यांच्या सरकारी निवासस्थानी देखील चौकशी केल्याची अफवा पसरली होती. पंरतु, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले होते. निवासस्थानी कुणीही आले नव्हते. असे खासदार बृजभूषण यांच्याकडून  सांगण्यात आले आहे. दरम्यान तपासाच्या अनुषंगाने महिला कुस्तीपटूला महासंघाच्या कार्यालयात नेण्यात आले होते, अशी स्पष्टोक्ती पोलिसांकडून तदनंतर देण्यात आली होती.
हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT