Latest

तब्बल 10 कोटींचे सँडविच

Arun Patil

मेक्सिको : एखादे सँडविच जास्तीत जास्त किती किमतीला असू शकेल, याच्या काही मर्यादा जरूर असतात. पण, एखादा सँडविच तो ही अर्धा खाऊन टाकलेला, जर 10 कोटी रुपयांना विकला जात असेल, तर त्यात अर्थातच भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. फेसबुक मार्केट प्लेसमध्ये हा सँडविच विक्रीसाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी लोक वापरलेल्या वस्तूंचीही खरेदी-विक्री करतात. हा सँडविच 1.3 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 10 कोटी रुपयांना आहे. या सँडविचबाबतची पोस्ट इंग्लंडच्या लीस्टरमध्ये राहणार्‍या व्यक्तीने केली आहे. यात चीझ आणि मीट आहे. हे क्रिस्पी आहे; पण आता हे सँडविच नक्की कुणी खाल्ले, त्याबाबत काही माहिती नाही.

आता, इतके पैसे मोजून अर्धे खाल्लेेले सँडविच कोणी कशासाठी आणि इतक्या महागड्या किमतीला का विकत घेईल, याचा उलगडा आतापर्यंत कुठेही झालेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साहजिकच, असे या सँडविचमध्ये काय खास आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

SCROLL FOR NEXT