Latest

Sandeshkhali in West Bengal: ‘तृणमूल’ला दहशतवादी संघटना घोषित करा अन् ममतांना अटक करा; भाजप नेत्याची मागणी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: संदेशखळी प्रकरणावरून भाजप टीएमसीवर सातत्याने हल्ला करत आहे. संदेशखळी हिंसाचार आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना उघडकीस आल्यानंतर भाजपने बंगालमधील कायद्याचे राज्य संपल्याचे म्हटले आहे. दरम्यान, संदेशखळीमध्ये विदेशी शस्त्रे सापडल्यानंतर भाजपने ममतांवर निशाणा साधला आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस या संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित करा आणि या घटनांसाठी पं.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करा, असे म्हटले आहे. (Sandeshkhali in West Bengal)

Sandeshkhali in West Bengal : पं.बंगालमध्ये देशविरोधी कारवाया-भाजप

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, संदेशखळी येथे सीबीआयच्या छाप्यात सापडलेली सर्व शस्त्रे विदेशी आहेत. बंगालमध्ये आरडीएक्ससारखी स्फोटके सापडत असून त्यांचा वापर भयंकर देशविरोधी कारवायांमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Sandeshkhali in West Bengal)

तृणमूल काँग्रेसला दहशतवादी संघटना घोषित करा

सुवेंदू यांनी पुढे म्हटले आहे की, पं.बंगालमधील संदेशखळी येथून जप्त करण्यात आलेली सर्व शस्त्रे आंतरराष्ट्रीय दहशतवादी वापरतात. पण राज्य सरकार काहीच करत नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला दहशतवादी संघटना घोषित करून ममता बॅनर्जींना अटक करावी, असेही ते म्हणाले. (Sandeshkhali in West Bengal)

शाहजहान शेखच्या जवळच्या मित्राच्या घरातच शस्त्रे सापडली

सीबीआयने संदेशखळी येथील तृणमूल नेते शाहजहान शेख यांच्या जवळच्या साथीदाराच्या घरावर छापा टाकला होता, जिथे झडतीदरम्यान विदेशी शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात बॉम्ब सापडले होते. या झडतीदरम्यान शाहजहानच्या जवळच्या साथीदाराच्या घरातून ३४८ गोळ्या, चार अत्याधुनिक विदेशी बंदुक, तीन देशी बनावटीच्या बंदुका, बॉम्ब बनवण्याचे मसाले आणि अनेक बॉम्ब सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर एनएसजी कमांडोंनी इस्रायली रोबोटच्या मदतीने बंद घरामध्ये आणि आजूबाजूला शोध मोहीमही राबवली. एनएसजी बॉम्ब शोधक आणि शोध पथकाने स्फोटके सुरक्षितपणे गोळा केल्यानंतर ते निकामी केले.

Sandeshkhali in West Bengal

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT