पुढारी ऑनलाईन डेस्क : संदीप रेडी वांगा आधी शाहिद कपूरसोबत चित्रपट 'कबीर सिंह' घेऊन आले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाच्या कमाईने अनेक रेकॉर्ड बनवले होते. आता संदीप चित्रपट 'ॲनिमल'च्या माध्यमातून १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या समोर असणार आहे. (Animal In Telugu ) या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. (Animal In Telugu )
संबंधित बातम्या –
'आपको बस पापा पापा कहना है और मैं आपकी एक्टिंग करूंगा.' हा रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटातील ट्रेलरमधील सीन सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 'ॲनिमल'चे निर्मात्यांनादेखील खूप अपेक्षा आहेत. जर हा चित्रपट हिट ठरला तर भविष्यात दिग्दर्शक संदीप रेडी वांगा या चित्रपटाचे तेलुगु रिमेक बनवतील आणि यासाठी त्यांनी मुख्य अभिनेतादेखील फायनल केला आहे.
संदीप रेडी वांगा आणि त्यांची टीम सध्या 'ॲनिमल'च्या प्रमोशनमध्ये मग्न आहे. प्रमोशनच्यावेळी जेव्हा तेलुगु रीमेकविषयी प्रश्न विचारण्यात आले तेव्हा रणबीर कपूर म्हणाला की, तो 'तेलुगु' रिमेकमध्येदेखील काम करु इच्छितो. जेव्हा वांगाने चित्रपटासाठी Prince of Tollywood चे नाव घेतले. म्हणजेच वांगा यांना 'ॲनिमल'च्या तेलुगु रिमेकमध्ये महेश बाबूला घ्यायचं होतं. महेश बाबूचे टॉलीवूडमध्ये मोठे नाव आहे. जर ॲनिमलच्या तेलुगु रिमेकमध्ये टफ लुकमध्ये महेश बाबूला पाहणे खूप उत्सुकतेच ठरेल.