Latest

Samsung Galaxy S23 FE : दमदार फिचर्ससह सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च! जाणून घ्या फिचर्स

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : सॅमसंगने आज (दि.४) आपल्या लोकप्रिय Galaxy S सीरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy S23 FE भारतात लॉन्च केला आहे. या फोनची बेसिक किंमत 49,999 रुपये आहे. मिंट, ग्रेफाइट आणि पर्पल या तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंगने सांगितले की, S23 FE आजपर्यंतच्या सर्वात अॅडव्हॉन्स कॅमेरा अपग्रेडसह लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 50MP (W) + 12MP (UW) + 8MP (OIS) कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung च्या Galaxy S23 FE मध्ये 8GB रॅम, 128 GB मेमरी आणि 256 GB या दोन वेगवेगळ्या स्टोरेज पर्यायांसह फोन लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंगने सांगितले की, Galaxy S23 FE दि. 5 ऑक्टोबर 2023 पासून Samsung.com आणि Amazon.in येथे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनीची डिलिव्हरी ग्राहकांना ७ ऑक्टोबरपासून मिळणार आहे.

काय आहे Samsung Galaxy S23 FE ची किंमत

Samsung ने सांगितले की, S23 FE च्या 8GB + 128GB या व्हेरियंटची किंमत 49,999 रुपये आहे. तर 8 GB + 256GB व्हेरियंटची किंमत 54,999 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना 10,000 रुपयांचे फायदे देखील मिळणार आहेत. ज्यामध्ये बँक कॅशबॅक, अपग्रेड बोनस इ. सोयीनुसार, ग्राहक Samsung S23 FE च्या खरेदीवर 24 महिने विनाशुल्क EMI देखील निवडू शकतात.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT